‘जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत समविचारी पक्षांसोबत युती करू. मात्र, स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेण्यात येईल,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात स्पष्ट केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी रणनीती जाहीर केली. ‘पुणे जिल्हा परिषद आपल्या विचारांच्या लोकांच्या हातात असल्याचा इतिहास आहे. त्यासाठी पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन समविचारी पक्षांसोबत युती करून करू,’ असे पवार म्हणाले. पुढील निवडणुकांमध्येही स्थानिक पातळीवर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या विधानानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.








