पिसाळलेल्या कुत्र्याचापंधरा जणांना चावा

महाराष्ट्र टाइम्स

जुन्या जालन्यात मतदान केंद्रावर जाणाऱ्या नागरिकांवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला. या हल्ल्यात पंधरा जणांना कुत्र्याने चावा घेतला. लहान बालके आणि एका वृद्ध व्यक्तीलाही इजा झाली. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार कचेरी रोड, सरस्वती भुवन आणि शनी मंदिर परिसरात घडला.

rabid dog bites fifteen citizens during voting

मतदान करण्यासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या एका कुत्र्याने हल्ला करून पंधरा नागरिकांना चावा घेतला. यात दोन लहान बालकांचा समावेश असून, एका वृद्ध नागरिकाची करंगळी कुत्र्याने तोडली आहे. दरम्यान, जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जुन्या जालन्यातील कचेरी रोडवर दुपारी तीन वाजेच्या सुमारास सरस्वती भुवन आणि शनी मंदिर परिसर, काली मशीद परिसरात मतदान करण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला केला. काही समजण्याच्या आतच एकामागोमाग एक या कुत्र्याने पंधरा नागरिकांना चावा घेतला.