पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडले. धायरी फाटा चौकातील नारायण सणस प्रशाला या ठिकाणी तब्बल नऊ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे या मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांची संख्या मोठी होती. परिणामी दिवसभर या चौकात वाहतूक कोंडी झाली होती.
प्रत्येक पक्षाने मतदार ांच्या मदतीसाठी मतदान केंद्राबाहेर मतदार चिठ्ठी देण्यासाठी टेबल मांडून केंद्र स्थापन केले होते. यंदा अनेक मतदारांची मतदान केंद्रे बदलल्याने या ठिकाणी गर्दी झाली होती. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात वाहने उभी करण्यास तसेच पक्षाचे मदत केंद्र उभारण्यास मज्जाव असताना रस्त्यावर असणाऱ्या शाळा, महाविद्यालयांच्या केंद्र बाहेरील प्रवेशद्वारावर गर्दी झाल्याने अनेक मतदारांना केंद्रामध्ये जाण्यासाठी अडथळे पार करावे लागत होते.








