मतदानाने मिळाली ‘माणूस’ म्हणून ओळख

महाराष्ट्र टाइम्स

पुणे महापालिका निवडणुकीत पारलिंगी मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केले. यामुळे लोकशाहीत सर्वसमावेशक चेहरा दिसला. निवडणूक आयोगाच्या 'स्वीप' उपक्रमाने पारलिंगी नागरिकांना मतदार म्हणून ओळख मिळवून दिली. मतदान केंद्रांवर त्यांना सन्मान मिळाला. मतदानाच्या शाईने त्यांना 'माणूस' म्हणून ओळख मिळाली.

transgender voters participation in democracy recognition as humans through voting

पुणे महापालिका निवडणुकीत वेगगेवगळ्या प्रभागांमध्ये पारलिंगी (ट्रान्सजेंडर) मतदारांनी आवर्जून मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदविला. त्यामुळे शहरात लोकशाहीचा सर्वसमावेशक चेहरा पाहायला मिळाला. ‘आम्ही मतदानाचा अधिकार बजावतानाच देशाचे सुजाण नागरिक असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे,’ असे पारलिंगी मतदारांनी आवर्जून सांगितले. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर मानल्या जाणाऱ्या पारलिंगी समुदायाला लोकशाहीच्या प्रवाहात आणण्यासाठी निवडणूक आयोगाच्या 'स्वीप’ उपक्रमांतर्गत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत पारलिंगी नागरिकांची नावनोंदणी करून मतदार कार्ड उपलब्ध करून दिले जात आहे. धनकवडी-सहकारनगर सहायक आयुक्त कार्यालयाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुप्रिया करमरकर आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेखा भणगे यांनी ‘मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘सीवायडीए’ संस्थेच्या कादंबरी शेख यांच्या मदतीने मतदारयाद्यांतील ३४ पारलिंगी मतदारांशी संवाद साधून त्यांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर बहुसंख्य पारलिंगी नागरिकांनी मतदानाचा अधिकार बजावला.

‘मतदान केंद्रांवर येणाऱ्या पारलिंगी मतदारांना अत्यंत सन्मानजनक वागणूक मिळाली. प्रत्येक मतदाराची मतप्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी प्रशासनाने सहकार्य केले. नेहमी उपेक्षेची वागणूक मिळणाऱ्या मतदानाच्या शाईने ‘माणूस’ म्हणून ओळख मिळवून दिली आहे.’ असेही कादंबरी शेख यांनी सांगितले.