चार दिवसीय ऑनलाइन पेरेंटिंग कार्यशाळा

महाराष्ट्र टाइम्स

पौरस देशपांडे यांची 'स्प्रेडिंग नॉलेज' संस्था आणि 'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब' संयुक्तपणे पालकांसाठी ४ दिवसांची ऑनलाइन पेरेंटिंग कार्यशाळा आयोजित करत आहेत. या कार्यशाळेत मुलांच्या अभ्यासातील अडचणी, हट्टीपणा, राग आणि आत्मविश्वास यांसारख्या समस्यांवर मार्गदर्शन केले जाईल. अमित चव्हाण हे १२ वर्षांचा अनुभव असलेले समुपदेशक या कार्यशाळेत मार्गदर्शन करतील. ही कार्यशाळा झूमवर होणार असून रेकॉर्डिंग दोन महिने पाहता येईल.

चार दिवसीय ऑनलाइन पेरेंटिंग कार्यशाळा
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

१० वर्षांपर्यंतच्या मुलांचा काळ हा फक्त बालपणाचा काळ नाही, तर मुलांच्या मनाची आणि भावनांची रचना होण्याचा काळ आहे. या टप्प्यात पालक कसे वागतात, यावर मुले पुढे आयुष्यात ताण, अपयश आणि नाती कशी हाताळतील ते ठरते. पालक शांत, समजून घेणारे असतील तर मुलेही स्वतःशी तशीच वागायला शिकतात. किशोरवयातील अनेक समस्या लहानपणीच्या पालकत्वाशी जोडलेल्या असतात. सुरुवातीला योग्य संगोपन केल्यास पुढचे संघर्ष कमी होतात.

या धर्तीवरच पौरस देशपांडे यांची ‘स्प्रेडिंग नॉलेज’ ही संस्था आणि ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’ या दोघांच्या संयुक्त विद्यमाने ० ते १० वर्षे वयाच्या मुलांच्या पालकांसाठी एक खास ४ दिवसांची ‘पेरेंटिंग कार्यशाळा’ घेण्यात येत आहे..

काय असेल या कार्यशाळेत ?

मुलं अभ्यास करत नाहीत?

सतत टीव्ही किंवा मोबाइल बघतात?

मुलं हट्टी आहेत का?

मुलं ऐकत नाहीत का?

मुलं रागीट आहेत का?

शिस्त लावताना अपराधीभाव येतोय का?

मुलांचा आत्मविश्वास कमी वाटत आहे का?

अशा अनेक प्रश्नांच्या सोबतीने लहान मुलांच्या स्वभावाची आणि अनेक प्रश्नांची उकल यातून केली जाईल

मोठेपणी दिसणारी चिंता, नैराश्य, कमी आत्मविश्वास अशा मानसिक आजारांची मुळे अनेकदा लहानपणीच्या भावनिक अनुभवात असतात. मुलांच्या भविष्यातील शैक्षणिक वाढ, आर्थिक यश आणि प्रतिष्ठा यांसाठी भावनिक बुद्धिमत्ता अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. हा कोर्स पालकांना त्यासाठी सक्षम करेल. पालकांना समज, स्पष्टता आणि वापरता येतील, असा दृष्टिकोन देण्यासाठी आहे. म्हणूनच यासाठी गेल्या १२ वर्षांपासून कौन्सिलर म्हणून काम करणारे अमित चव्हाण हे यात मार्गदर्शन करणार आहेत.

विविध शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि पालकांनाही ते समुपदेशन करतात.

ही कार्यशाळा ऑनलाइन झूमवर होणार असून रेकॉर्डिंग पुढील दोन महिने पाहण्याची सोय असेल. ही कार्यशाळा सशुल्क असून ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’ सदस्यांना यात सवलत असेल.