पारंपरिक गडावर चलबिचल

महाराष्ट्र टाइम्स

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत दादर-माहीम परिसरातील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. धारावी पुनर्विकासासारख्या मुद्द्यांनी वातावरण तापले होते. मतमोजणी केंद्रावर कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. प्रत्येक फेरीच्या निकालानंतर जल्लोष साजरा होत होता. काँग्रेसने सकाळीच खाते उघडल्याने आनंद व्यक्त करण्यात आला. आशा काळे यांनी विजय मिळवला. ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.

पारंपरिक गडावर चलबिचल
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

ठाकरेबंधूंच्या मनोमीलनामुळे दादर-माहीमचा पारंपरिक शिवसेनेचा गड कोण राखणार, याकडे लागलेले डोळे; धारावी पुनर्विकासासारख्या मुद्द्यांवर तापलेल्या वातावरणात झालेले मतदान या सर्वांचे प्रतिबिंब प्रभाग १८२ ते १९२मधील मतमोजणीच्या वेळी दिसून आले. आघाडी आणि महायुतीत चुरशीची लढाई पाहायला मिळाली.

मतमोजणीच्या दिवशी समर्थक-कार्यकर्त्यांची दादर स्थानकापासूनच गर्दी उसळली होती. डॉ. अँटोनिओ डिसिल्वा शाळेत मतमोजणी सुरू होताच उत्सुकता, अस्वस्थता आणि अधीरतेचे भाव कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

मतमोजणी केंद्राच्या परिसरात आणि कबुतरखान्याजवळ विविध पक्षांचे कार्यकर्ते निकालाच्या प्रतीक्षेत ताटकळत उभे होते. प्रत्येक फेरीचा निकाल जाहीर होताच आघाडीवर असलेल्या उमेदवारांच्या गोटात जल्लोष उसळत होता. मतमोजणीच्या दिवशी समर्थक-कार्यकर्त्यांची दादर स्थानकापासूनच गर्दी उसळली होती. डॉ. अँटोनिओ दा सिल्वा शाळेत मतमोजणी सुरू होताच उत्सुकता, अस्वस्थता आणि अधीरतेचे भाव कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. दोन्ही सेनांचे कार्यकर्ते आमनेसामने येऊ नयेत, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. धारावीतील काँग्रेस कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिक आणि मुस्लिम महिलाही मोठ्या संख्येने निकालाच्या प्रतीक्षेत उपस्थित होत्या.

मतमोजणी केंद्राच्या परिसरात आणि कबुतरखान्याजवळ विविध पक्षांचे कार्यकर्ते निकालाच्या प्रतीक्षेत ताटकळत उभे होते. प्रत्येक फेरीचा निकाल जाहीर होताच आघाडीवर असलेल्या उमेदवारांच्या गोटात जल्लोष उसळत होता.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेसने सकाळीच खाते उघडल्याची घोषणा होताच एकच जल्लोष उसळला. दक्षिण मध्य मुंबईतील धारावी परिसरातील प्रभाग क्रमांक १८३मधून काँग्रेसच्या उमेदवार आशा काळे यांनी दिमाखदार विजय मिळवला.

या मतदारसंघात शिवसेनेचे निष्ठावंत मिलिंद वैद्य, जोसेफ कोळी, अर्चना शिंदे आणि टी. जगदीश हे विजयाचे दावेदार मानले जात असताना निकालाने वेगळेच चित्र समोर आणले. निकाल जाहीर होताच ‘उद्धव-राज साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला. ढोल-ताशांचा आवाज वाढत गेला आणि गुलालाची उधळण सुरू झाली. भगवे टी-शर्ट, साड्या परिधान केलेल्या महिला कार्यकर्त्या व समर्थकांनी एकमेकांना गुलाल लावून आनंद साजरा केला.