भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती

महाराष्ट्र टाइम्स

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात युतीची चर्चा सुरू आहे. जागा वाटपावर विचारविनिमय सुरू असून दोन्ही पक्षांचे नेते बैठका घेत आहेत. भाजपकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी आहे. इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. युतीबाबत भाजप सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले आहे.

interviews for bjp candidates begin preparations for district council panchayat committees also underway

महापालिका निवडणुकीत जागा वाटपावरुन शिवसेना भाजप युती तुटली. या निवडणूकीत भाजपने ५७ तर शिवसेनेला केवळ १३ जागेवर समाधान मानावे लागले. दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत युती म्हणून सामोरे जाण्याच्या अनुषंगाने सोमवारी भाजप व शिवसेना नेत्यांची बैठक झाली. भाजपकडून ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार संजय केणेकर, प्रशांत बंब, अनुराधा चव्हाण, जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, सुहास शिरसाठ, शहराध्यक्ष किशोर शिताळे तर शिवसेनेकडून पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे, रमेश बोरनारे, संजना जाधव आदी उपस्थित होते. जागा वाटपांसंदर्भात रात्री उशीरापर्यंत चर्चा सुरु होती. त्यामुळे अधिक तपशील समजू शकला नाही. दरम्यान, युतीबाबत भाजप सकारात्मक असल्याचे मंत्री सावे व आमदार केणेकर यांनी सांगितले.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेच. भारतीय जनता पक्षाकडे इच्छुकांनी उमेदवारीसाठी गर्दी केली असून सोमवारी या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. दरम्यान, अर्ज दाखल करण्यासाठी २१ जानेवारी ही शेवटीची तारीख असल्याने उमेदवार निवडीसाठी नेतेमंडळी व पदाधिकाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत युतीसाठी भाजप शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. ही बैठक रात्री उशीरापर्यंत सुरू असल्याने अधिक तपशील समजू शकला नाही. युतीसाठी भाजप सकारात्मक असल्याचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे व आमदार संजय केणेकर यांनी सांगितले.

भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती

भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती

जिल्ह्यात एकूण जिल्हा परिषदचे ६३ गट आणि पंचायत समितीचे १२६ गण आहेत. महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीची लगबग सुरू असतानाच १६ जानेवारीला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाली आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील इच्छुक कामाला लागले. उमेदवारी मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाकडे गर्दी होत असून भाजपकडे उमेदवारी मिळविण्यासाठी १ हजाराहून अधिक कार्यकर्ते इच्छुक असल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.

दरम्यान, चिकलठाणा येथील भाजप कार्यालयात सोमवारी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. बायाडोटासह इच्छुक उपस्थित होते. मुलाखतीसाठी एकूण दहा पॅनल तयार करण्यात आले होते. ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार संजय केणेकर, अनुराधा चव्हाण, जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, सुहास शिरसाठ, शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासह कोअर कमिटीचे सदस्य, प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या मुलाखती घेतल्या. इच्छुक उमेदवारांची कशा पद्धतीने तयारी केली आहे, हे जाणून घेऊन संबंधित मतदारसंघातील समीकरणे, त्याचबरोबर तयारीचा आढावा पॅनल प्रमुखांनी इच्छुकांकडून घेतला.

दरम्यान, मंत्री सावे, खासदार कराड, भाजप नेते दानवे, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला.