बांगलादेशला पाठिंबा, पाकही माघारीस तयार!

महाराष्ट्र टाइम्स

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बांगलादेशला पाठिंबा दर्शवला आहे. आगामी टी-२० विश्वचषकातून माघार घेण्याची भूमिका पाकिस्तानने घेतली आहे. पाकिस्तानने आपल्या संघाची विश्वचषक तयारी थांबवली आहे. बांगलादेशाच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा देत पाकिस्तानने भारतीय क्रिकेट बोर्डाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. बांगलादेशाच्या सामन्यांचे यजमानपद भूषवण्याची तयारीही पाकिस्तानने दाखवली आहे.

support for bangladesh cricket pakistan ready to withdraw from world cup
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) बांगलादेश क्रिकेट बोर्डाला (बीसीबी) पाठिंबा देत आयसीसीच्या आगामी टी-२० वर्ल्ड कपमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तान संघाची वर्ल्ड कप तयारीही थांबवण्यात आली आहे. बांगलादेशच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा देत, पीसीबीने आयसीसी आणि भारतीय क्रिकेट बोर्डाला (बीसीसीआय) कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी बांगलादेशसोबत वर्ल्ड कप आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करत आहेत. शनिवारी झालेल्या पाकिस्तान आणि बांगलादेश सरकारांमधील बैठकीत नक्वी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या बैठकीत बांगलादेशला पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, गरज पडल्यास वर्ल्ड कपमधील सहभागावर पुनर्विचार करण्याचेही संकेत देण्यात आले आहेत.
या घडामोडींमुळे पाकिस्तान संघाला वर्ल्ड कप तयारीचा वेग कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. श्रीलंकेत स्टेडियम उपलब्ध नसल्यास, बांगलादेशच्या वर्ल्ड कप सामन्यांचे आयोजन करण्याची तयारीही पीसीबीने दाखवली होती. या सर्व घडामोडी आयसीसी आणि बीसीसीआयसाठी एक मोठे आव्हान निर्माण करणाऱ्या आहेत.