वर्षभराचा ‘मटा’ मिळवा फक्त १४९९मध्ये

महाराष्ट्र टाइम्स

महाराष्ट्र टाइम्स आता वर्षाभरासाठी केवळ १४९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. पुणेकरांचा लाडका मित्र बनलेल्या मटाने अनेक उपक्रम राबवले आहेत. मटा हेल्पलाइन, नवरंग, मटा कलासंगम, मटा बाइक रॅली, श्रावणक्वीन आणि प्लॅनेट कॅम्पस यांसारख्या उपक्रमांना पुणेकरांनी नेहमीच भरभरून प्रतिसाद दिला आहे. या सर्व दर्जेदार आशयाचा लाभ आता १४९९ रुपयांत घेता येईल.

get a one year subscription of maharashtra times for just 1499

एकमेव निष्पक्ष वृत्तपत्र हे बिरुद अभिमानाने मिरविणारा ‘ महाराष्ट्र टाइम्स ’ अवघ्या १४९९ रुपयामध्ये वर्षभर मिळणार आहे. कमी कालावधीत ‘महाराष्ट्र टाइम्स’ पुणेकरांचा जिवाभावाचा स्मार्ट मित्र झाला आहे. वृत्तपत्र विक्रेत्याकडे १४९९ रुपयांचा चेक देऊन तुम्ही ‘महाराष्ट्र टाइम्स’चे वार्षिक वर्गणीदार होऊ शकता.

दर्जेदार आशय आणि विषयांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘मटा’ची मुंबईबाहेरील पहिली आवृत्ती पुण्यात सात जानेवारी २०११ रोजी सुरू झाली. एकविसाव्या शतकात वेगाने वाढणाऱ्या आणि महानगराचे स्वरूप धारण करू पाहणाऱ्या पुण्याचे प्रतिनिधित्व करण्याचा वसा ‘मटा’ने पहिल्या दिवसापासून हाती घेतला असून, चोखंदळ पुणेकरांनी नेहमीच ‘मटा’ला भरभरून प्रतिसाद दिला.

‘मटा’च्या विविध उपक्रमांना पहिल्या वर्षापासूनच वाचकप्रियता लाभली. गरीब विद्यार्थ्यांना वाचकांकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचा ‘मटा हेल्पलाइन’सारखा उपक्रम असो किंवा ‘नवरंग’सारखा महिलाप्रिय उपक्रम असो; पुणेकरांनी प्रत्येक वेळी ‘मटा’ला भरभरून प्रोत्साहन दिले. साहित्यप्रेमींसाठी ‘मटा कलासंगम’, ‘मटा बाइक रॅली’, तरुण मुलींसाठी दर वर्षी आयोजित केली जाणारी ‘श्रावणक्वीन’सारखी स्पर्धा, विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि करिअरविषयक मार्गदर्शन करण्यासाठी ‘प्लॅनेट कॅम्पस’ अशा अनेक उपक्रमांना पुणेकरांचा मोठा प्रतिसाद मिळतो. अशा ‘मटा’चे वर्षभराचे अंक केवळ १४९९/- रुपयांत उपलब्ध होणार आहेत.