दिव्यांग तपासणीत तफावत;सहा कर्मचारी निलंबित

महाराष्ट्र टाइम्स

राज्य शासनाच्या आदेशानुसार दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी सुरू आहे. जळगाव जिल्हा परिषदेतील सहा कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग टक्केवारीत तफावत आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. आतापर्यंत १९ कर्मचारी निलंबित झाले आहेत. ही कारवाई दिव्यांग कल्याण विभागाच्या निर्देशानुसार सुरू आहे. यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

suspension action against disabled employees six employees found discrepancies

राज्याच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या आदेशानुसार राज्यातील दिव्यांग कर्मचारी व दिव्यांग व्यक्तींच्या दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या तपासणीत जिल्हा परिषदेच्या सहा कर्मचाऱ्यांची निकषानुसार टक्केवारीत तफावत आढळून आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी त्यांच्यावर शुक्रवारी निलंबनाची कारवाई केली. आतापर्यंत निलंबित करण्यात आलेल्या कर्मचारी यांची संख्या १९ इतकी झाली आहे.

राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिव्यांग कर्मचारी यांची युआयडी कार्ड तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात जळगाव जि.प.च्या विविध आस्थापनांवर कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांचीदेखील तपासणी करण्यात येत आहे. या तपासणी दरम्यान दिव्यांग टक्केवारी तफावत आढळून आलेल्या कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे. त्यानुसार राजेश खैरनार, प्रदीप ढाके, अजय शिरसाठ, ज्ञानेश्वर चौधरी, स्वप्नाली पाटील, पंकजा वाघ या कर्मचाऱ्याविरुद्ध निलंबनाची कारवाई केली आहे.