‘डिपेक्स-२०२६’ येत्या पाच मार्चपासून

महाराष्ट्र टाइम्स

DipEx-2026, a state-level exhibition and competition, will be held from March 5 to March 8 at Maharashtra Institute of Technology, Chhatrapati Sambhajinagar. Organized by Akhil Bharatiya Vidyarthi Parishad and Srujan Trust, the event will showcase working models created by students. ISRO's former chairman S. Somanath will inaugurate the event. Students and industry professionals will interact, fostering innovation and collaboration.

‘डिपेक्स-२०२६’ येत्या पाच मार्चपासून
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व सृजन ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ‘ डिपेक्स-२०२६ ’ प्रदर्शन आणि स्पर्धा पाच मार्च ते आठ मार्च दरम्यान महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी , छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमास विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, विद्यापीठे, उद्योजक, संशोधक, इनक्युबेशन सेंटरचे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती उद्योजक, स्वागत समितीचे संरक्षक राम भोगले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘डिपेक्स-२०२६’चे उदघाटन इस्त्रोचे माजी अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्या हस्ते पाच मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. या वेळी राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. राज्यस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे ६ मार्च रोजी प्रदर्शनास भेट देणार आहेत. सहभागी विद्यार्थी, प्राध्यापकांसाठी विविध विषयावर सेमिनारदेखील आयोजित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र, गोवा ४२५ प्रकल्प घेऊन दोन हजार विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र, गोवा व गुजरात राज्यातील ५० इन्क्युबेशन सेंटर सहभागी होणार आहेत. त्यांच्यासाठी सहा आणि सात मार्च या दिवशी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

‘डिपेक्स’मध्ये राज्यातील अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण, कृषी तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली वर्किंग मॉडेल्स या प्रदर्शनात सादर केली जाणार आहेत. कृषी तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, संरक्षण व सायबर सुरक्षा, ऊर्जा, औद्योगिक स्वयंचलन, वैद्यकीय तंत्रज्ञान, मोबिलिटी, शाश्वत नागरी पायाभूत सुविधा आणि सुरक्षा अशा विविध विषयांवर आधारित प्रकल्पांचे सादरीकरण होणार आहे. माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राशी थेट संवादाची संधी मिळणार आहे.

विद्यार्थी, नागरिकांनी प्रदर्शनास पाच ते आठ मार्च दरम्यान सकाळी नऊ ते रात्री आठ दरम्यान भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आली. पत्रकार परिषदेला स्वागत समितीचे कार्याध्यक्ष मुनीष शर्मा, सचिव डॉ. अनंत पंढरे, प्रदेशाध्यक्ष प्रा. सुरेश मुंढे, प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे, महानगर सहमंत्री निवेदिता केंद्रे, उद्योजक उमेश दाशरथी, विवेक भोसले, मुकुंद कुलकर्णी, आशिष गर्दे, प्रवीण घुगे, राहुल पगारिया आदींची उपस्थिती होती.