अवैध फेरीवाल्यांवर ‘सर्जिकल स्ट्राइक’

Contributed byआमदार|महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra government has ordered strict action against illegal hawkers to tackle severe traffic congestion in Pune. The state government has directed immediate and stringent action against unauthorized vendors. Ward officers found negligent will face administrative action. This move follows discussions in the state assembly highlighting the problems faced by Pune residents due to encroachments on footpaths and roads.

municipal surgical strike on illegal street vendors crackdown planned on encroachments on 14 major roads

महापालिकेच्या ‘फेरीवाला समिती’च्या दोन बैठका पार पडल्या आहेत. शहरातील ३२ मुख्य रस्त्यांपैकी १४ रस्त्यांवर सर्वाधिक कोंडी होत असल्याने तेथील फेरीवाला झोन स्थलांतरित करण्याची प्रक्रिया महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी सुरू केली आहे. वडगाव शेरीसारख्या ‘आयटी हब’मध्ये मोठी वर्दळ असते. वारंवार कारवाई करूनही अतिक्रमणे पुन्हा होत असल्याचे मान्य करून मंत्र्यांनी पोलिस प्रशासन आणि महापालिका यांच्यात अधिक समन्वय साधून कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. अधिकृत वाहनतळ आणि फेरीवाला क्षेत्रांची सविस्तर माहिती लवकरच सभागृहासमोर मांडली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे वाढलेल्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने कडक भूमिका घेतली आहे. विनापरवाना फेरीवाल्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे आदेश उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांनी विधानसभेत दिले. कारवाईत कुचराई करणाऱ्या वॉर्ड अधिकाऱ्यांवरही प्रशासकीय कारवाई होईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार बापू पठारे यांनी पुण्यातील वाहतूक कोंडी व वाढत्या अतिक्रमणांबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना देसाई यांनी थेट कारवाईचे आदेश दिले. चर्चेत आमदार राहुल कुल, प्रशांत बंब आणि भीमराव तपकीर यांनीही सहभाग घेऊन पुणेकरांच्या अडचणी अधोरेखित केल्या.

‘महाराष्ट्र टाइम्स’ने शहरातील पदपथांवरील अतिक्रमणांविरोधात स्पष्ट भूमिका घेऊन महापालिका; तसेच पोलिस प्रशासनापुढे प्रश्न उपस्थित केले होते. त्या पार्श्वभूमीवर विधानसभेत झालेल्या चर्चेत शहरातील पदपथांवरील अतिक्रमणांचा मुद्दा गांभीर्याने चर्चिला गेला.