दोन दुचाकी लंपास

महाराष्ट्र टाइम्स

Two motorcycles have been stolen from the Cidco area of Chhatrapati Sambhajinagar. The first theft occurred from the residence of Avinash Kisan Pawar, with his motorcycle MH 12 PQ 7409 taken. Another motorcycle was stolen from the front of Manoj Sudhakar Danve's house. Police have registered cases in both incidents at the Cidco police station.

दोन दुचाकी लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरातील विविध भागांतून दोन दुचाकी लंपास केल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. यात अविनाश किसन पवार (वय ४५, रा. एन ७, सिडको) यांची दुचाकी क्रमांक एमएच १२ पीक्यू ७४०९ ही अविनाश पवार यांच्या घरासमोरून चोरण्यात आली. मनोज सुधाकर दानवे (वय ३३, रा. एन ६, सिडको) यांची दुचाकी ही घरासमोरून चोरट्याने चोरून नेली. या दोन्ही प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.