Pakistan Cricket Board Imposes Fine Of 50 Lakhs On Players
पाक खेळाडूंना ५० लाखांचा दंड
महाराष्ट्र टाइम्स•
पाकिस्तान क्रिकेट संघाला आयसीसी स्पर्धेत उपांत्य फेरीआधीच बाहेर पडावे लागले. या कामगिरीमुळे संघातील प्रत्येक खेळाडूला ५० लाख पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यापूर्वीही आशिया कप अंतिम सामन्यात भारताकडून पराभव झाल्यानंतर खेळाडूंवर कारवाई झाली होती. सुपर ८ फेरीतही पाकिस्तान निष्प्रभ ठरल्याने दंडाचा फेरा चुकला नाही.
आयसीसीच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतून पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीआधीच बाहेर पडला. या अपयशाबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघातील प्रत्येक खेळाडूला ५० लाख पाकिस्तानी रुपये (सुमारे १६ लाख ३८ हजार २२८ भारतीय रुपये) दंड ठोठावला आहे. विशेषतः भारताविरुद्धच्या पराभवामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधीही आशिया कपमध्ये भारताकडून पराभूत झाल्यानंतर खेळाडूंवर कारवाई झाली होती.
पाकिस्तान संघाला सलग चौथ्यांदा आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठता आली नाही. मात्र, टी-२० विश्वचषकात भारताविरुद्धचा पराभव त्यांना जास्त जिव्हारी लागला. याच कारणामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) संघातील प्रत्येक खेळाडूवर ५० लाख पाकिस्तानी रुपयांचा दंड लावला आहे. हा दंड भारतीय रुपयांमध्ये अंदाजे १६ लाख ३८ हजार २२८ रुपये होतो.भारताविरुद्धच्या गट साखळीतील पराभवानंतर हा दंड लगेचच सुनावण्यात आला होता. मात्र, सुपर ८ फेरीत चांगली कामगिरी करून उपांत्य फेरी गाठल्यास हा दंड माफ केला जाईल, असे प्रोत्साहनही बोर्डाने दिले होते. पण सुपर ८ फेरीतही पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक ठरली आणि त्यामुळे दंडाची रक्कम वसूल केली जाणार आहे.
याआधीही पाच महिन्यांपूर्वी आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताकडून पराभव झाल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंवर कारवाई झाली होती. त्यावेळी टी-२० लीगसाठी खेळाडूंना दिलेली नाहरकत प्रमाणपत्रे (NOC) तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. नंतर ही कारवाई स्थगित करण्यात आली होती.