धोतरे यांचा अन्नत्याग कायम

महाराष्ट्र टाइम्स

चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष वाढला आहे. लोहारडोंगरी खाण प्रकल्पाला विरोध करत बंडू धोतरे यांनी अन्नत्याग सुरू केला. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, धोतरे यांनी अन्नत्याग सुरूच ठेवला आहे. आंदोलकांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी थाळी बजाओ आंदोलन केले. पोलिसांनी धोतरे यांना बळजबरीने रुग्णालयात नेल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

dhotres hunger strike protest and government intervention

चंद्रपूर जिल्ह्यातील वाढता मानव-वन्यजीव संघर्ष आणि लोहारडोंगरी खाण प्रकल्पाविरोधात अन्नत्याग सत्याग्रह करणारे ‘इको-प्रो’चे अध्यक्ष बंडू धोतरे यांना पोलिस प्रशासनाने सोमवारी रात्री आंदोलनस्थळावरून उचलून रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातही त्यांनी आपला अन्नत्याग कायम ठेवला आहे. शासन आणि प्रशासनाचे वन्यजीव रक्षणाप्रती लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी; सहाव्या दिवशी आंदोलनस्थळी महिलांनी ‘थाळी बजाओ आंदोलन केले.

धोतरे यांची प्रकृती स्थिर असतानाही प्रशासनाने रात्रीच्या अंधारात त्यांना आंदोलनस्थळावरून उचलले. त्यांना बळजबरीने रुग्णालयात दाखल केले, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. डॉक्टरांच्या प्राथमिक तपासणीनंतर धोतरे यांनी स्वतःच्या शुद्धीवर असताना मला रुग्णालयात दाखल व्हायचे नाही, अशा आशयाचा लेखी नकार नोंदवला होता. तरीही पोलिसांनी त्यांना ग्णवाहिकेतून बळजबरीने हलविल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.