‘कल्चर क्लब’तर्फे‘द स्पीकिंग ट्री रिट्रीट’

महाराष्ट्र टाइम्स

मटा कल्चर क्लबतर्फे नाशिक येथे 'द स्पीकिंग ट्री रिट्रीट' आयोजित केले आहे. हे तीन दिवसांचे योगशिबिर २७ ते २९ मार्च २०२६ दरम्यान होणार आहे. डॉ. विश्वास मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली योग, ध्यान आणि मौनातून मनःशांती मिळेल. निसर्गाच्या सान्निध्यात स्वतःला नव्याने भेटण्याची ही संधी आहे. नोंदणीसाठी ९८१९५८१०७७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

‘कल्चर क्लब’तर्फे‘द स्पीकिंग ट्री रिट्रीट’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

‘मटा कल्चर क्लब’तर्फे ‘द स्पीकिंग ट्री रिट्रीट’ या तीन दिवसांच्या आध्यात्मिक योगशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे विशेष योगशिबिर २७ मार्च ते २९ मार्च २०२६ या कालावधीत नाशिक येथील योग विद्या गुरुकुलात होणार आहे.

प्रसिद्ध योगाचार्य डॉ. विश्वास मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या शिबिराचा उद्देश योग, ध्यान, मौन आणि आत्मसंवाद यांच्या माध्यमातून मनःशांती, विचारांना दिशा आणि जीवनात नवचैतन्य निर्माण करणे हा आहे. निसर्गाच्या सान्निध्यात स्वतःला नव्याने भेटण्याची ही एक सुंदर संधी ठरणार आहे.

या शिबिराला २७ मार्च रोजी दुपारी एक वाजता सुरुवात होईल, तर २९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता शिबिराची सांगता होणार आहे. शिबिरासाठी प्रत्येक व्यक्तीला ६५०० रुपये नोंदणी शुल्क आहे. यामध्ये निवास, भोजन आणि योगसत्रांचा समावेश आहे. या आध्यात्मिक योगअनुभवात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी ९८१९५८१०७७ या क्रमांकावर संपर्क साधावा.