प्राध्यापक भरती सुरू

महाराष्ट्र टाइम्स

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सुमारे पाच हजार १२ सहायक प्राध्यापकांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल. पुणे, मुंबई आणि नागपूर विद्यापीठांमधील रिक्त पदे भरली जातील. संलग्न महाविद्यालयांतील रिक्त पदांचीही भरती केली जाईल.

end of the professor recruitment stalemate in the state

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांमधील रिक्त प्राध्यापक पदांचा वनवास आता संपणार आहे. राज्यातील सुमारे पाच हजार १२ सहायक प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यात आली असून, येत्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, अशी ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.

आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी राज्यातील विद्यापीठांमधील रिक्त पदांबाबत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पाटील यांनी ही माहिती दिली.

पुणे विद्यापीठात १४५ जागा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापकांच्या २८७ मंजूर पदांपैकी केवळ १४२ पदे भरलेली असून, १४५ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांच्या भरतीस सरकारने मंजुरी दिली असून, प्रशासकीय स्तरावर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पुण्याप्रमाणेच मुंबई (२३५ पदे रिक्त) आणि नागपूर (२०९ पदे रिक्त) येथील विद्यापीठांमध्येही मोठ्या प्रमाणावर पदे भरली जाणार आहेत.

रिक्त पदांचा लेखाजोखा

पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील १५ विद्यापीठांमध्ये एकूण २,६०० शैक्षणिक पदे मंजूर असून, त्यापैकी १,४८७ पदे रिक्त आहेत. यातील पहिल्या टप्प्यात ६८७ पदांच्या भरतीस तातडीने मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील संलग्न महाविद्यालयांत एकूण ११,९१८ पदे रिक्त असून, ४० टक्के कोट्यानुसार ५,०१२ पदांची भरती प्रक्रिया ११ फेब्रुवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार सुरू करण्यात आली आहे.