जितो’ कार रॅलीला प्रतिसाद

महाराष्ट्र टाइम्स

जितो लेडीज विंगने थॅलेसेमिया जनजागृतीसाठी कार रॅलीचे आयोजन केले. अयोध्यानगरी मैदानावर झालेल्या या रॅलीत ४८ गाड्या आणि १८० स्पर्धक सहभागी झाले. या कार्यक्रमात मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आणि विविध प्रकारांतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांची उपस्थिती लाभली. या उपक्रमाने थॅलेसेमियाविषयी जागरूकता वाढवली.

enthusiastic response to womens car rally 2023 for thalassemia awareness

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) लेडीज विंगच्या वतीने महिला कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अयोध्यानगरी मैदानावर हा कार्यक्रम झाला. रॅलीची सुरुवात व समारोप या ठिकाणाहून झाली. कार रॅलीत ४८ गाड्यांचा सहभाग होता. त्यात १८० स्पर्धक सहभागी झाले होते. थॅलेसेमिया विषयी जनजागृती करणे हा यामागचा उद्देश होता. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, नगरसेवक हर्षदा सिरसाट, अनिता घोडेले, डॉ. राजेश सावजी, डॉ. महेंद्रसिंह चौहान, जॉर्ज फर्नांडिस, रवी खिंवसरा, पारस ओस्तवाल, अनिल संचेती, दीपल पगारिया, मनीषा भन्साळी आदींची प्रमुख उपस्थिती होती. मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. याशिवाय सर्वोत्कृष्ट कार सजावट, उत्साही टीम, सर्वोत्कृष्ट घोषवाक्य आदी प्रकारांतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमासाठी प्रिया मुथा, सोनल जैन, संगीता ओसवाल, दर्शू फुलफगर, अनुजा जैन, प्रीती बाकलीवाल आदींनी पुढाकार घेतला.