आजच्या धकाधकीच्या आयुष्यात ताणतणावातून मुक्ती मिळावी आणि निरोगी जीवनशैली राखता यावी या उद्देशाने ‘मटा कल्चर क्लब’तर्फे ‘द स्पीकिंग ट्री’ या विशेष योगशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वजवळ ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी दि. २७ ते २९ मार्च असे तीन दिवस स्वर्गानुभूती घेण्याची संधी वाचकांना मिळणार आहे. जगविख्यात योगाचार्य डॉ. विश्वास मंडलिक यांचे मार्गदर्शन साधकांना लाभणार आहे.
योग अन् बरेच काही
मोबाइल, लॅपटॉपसारख्या गॅझेटपासून काही काळ दूर ठेवून साधकाला नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे नेण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यासाठी त्याला आध्यात्म आणि निसर्गाच्या सान्निध्यात शिबिराच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाईल. डॉ. विश्वास मंडलिक सर व त्यांचे मानांकित योग शिक्षक साधकांकडून तीन दिवस विशेष योगाभ्यास करून घेतील. योग विद्या धाम केंद्रात ध्यानधारणा शिकवली जाईल. वेगवेगळ्या सत्रांच्या नियोजनासह एखाद्या आश्रमाप्रमाणे साधी राहणी आणि संतुलित शाकाहारी आहार ही शिबिराची वैशिष्ट्ये असतील.
हे लक्षात घ्या
शिबिरासाठी आगमन २७ मार्च रोजी दुपारी १ नंतर, तर प्रस्थान २९ मार्च रोजी सकाळी ११ नंतर राहील.
नोंदणी शुल्क ६५००/- प्रति व्यक्ती असून, यामध्ये निवास, भोजन आणि योगसत्रांचा समावेश आहे.
या आध्यात्मिक योगअनुभवात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी ९८१९५८१०७७ या क्रमांकावर संपर्क साधावा.





