Raid On Celestial Cafe In Bajaj Nagar Owner And Two Others Arrested
सेलेस्टियर कॅफेत छापा
महाराष्ट्र टाइम्स•
नागपूरच्या बजाजनगर पोलिसांनी सेलेस्टियर कॅफेत धाड टाकली. येथे हुक्का पार्लर चालत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी कॅफे मालक अमित इंगळे आणि व्यवस्थापक अभय राव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. कारवाईत तंबाखू आणि हुक्क्याचे साहित्य जप्त करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
नागपूर: बजाजनगर पोलिसांनी बजाजनगर चौकातील सेलेस्टियर कॅफेत धाड टाकून हुक्का पार्लर उघडकीस आणले. या प्रकरणी कॅफेचा मालक अमित भीमदेव इंगळे आणि व्यवस्थापक अभय प्रमोद राव यांच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून तंबाखू आणि हुक्क्याचे साहित्य जप्त केले आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतन चव्हाण यांना सेलेस्टियर कॅफेत ग्राहकांना हुक्का पुरवला जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक दीपक पवार, हेडकॉन्स्टेबल चंद्रशेखर तराळे, संजय, संतोष, योगेश्वर आणि राणी यांनी सोमवारी मध्यरात्री कॅफेत छापा टाकला.पोलिसांनी केलेल्या कारवाईत, कॅफेमधून प्रतिबंधित तंबाखू आणि हुक्क्याचे साहित्य जप्त करण्यात आले. या जप्त केलेल्या साहित्याची किंमत २९ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. अभय प्रमोद राव हा कॅफेचा व्यवस्थापक असून, अमित भीमदेव इंगळे हा कॅफेचा मालक आहे. या दोघांविरुद्ध बजाजनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.