पंचायत समित्या शिवसेना -भाजपकडे

महाराष्ट्र टाइम्स

जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांमध्ये सभापती आणि उपसभापतीपदांच्या निवडणुका पार पडल्या. या सर्व निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेने आपले वर्चस्व सिद्ध केले. युतीला मिळालेल्या बहुमतानुसार सर्व ठिकाणी त्यांचेच उमेदवार निवडून आले. छत्रपती संभाजीनगर, पैठण, सिल्लोड, गंगापूर, कन्नड, खुलताबाद, फुलंब्री, वैजापूर आणि सोयगाव या पंचायत समित्यांमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या सदस्यांनी सभापती व उपसभापतीपदांचा ताबा घेतला.

shiv sena bjps dominance continues in panchayat committees

पंचायत समिती निवडणुकीनंतर मंगळवारी जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांमध्ये सभापती, उपसभापतीपदाची निवडणूक झाली. अपेक्षेप्रमाणे सर्वच ठिकाणी भाजप – शिवसेनेचेच वर्चस्व राहिले. सार्वत्रिक निवडणुकीत युतीलाच बहुमत मिळाले होते.

छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती सभापतीपदी भाजपचे कल्याण गायकवाड तर उपसभापतीपदी शिवसेनेचे बाळासाहेब गाडे निवडून आले.

पैठण पंचायत समिती सभापतीपदी शिवसेनेचे वैशाली बोंबले ,उपसभापतीपदी शिवसेनेचे संजय लगाने निवडून आले. सिल्लोडमध्ये भाजपच्या अनिता बनकर सभापती तर भाजपचे भगवान आहेर उपसभापती झाले. गंगापूर सभापती कविता चव्हाण (भाजप), उपसभापती राजेश्वर हिवाळे (शिवसेना), कन्नड पंचायत समितीत सुप्रिया घुगे (शिवसेना)तर उपसभापतीपदी माया सुरासे (भाजप), खुलताबाद पंचायत समिती सभापतीपदी सुनिता खंडागळे (भाजप), उपसभापतीपदी मंदाबाई वाकळे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष), फुलंब्री सर्जेराव मेटे (भाजप सभापती), आश्विनी सोनवणे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, उपसभापती), वैजापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी वंदना शिंदे (शिवसेना)तर उपसभापतीपदी शिवसेना पुरस्कृत सोनाली जाधव निवडून आल्या. सोयगाव पंचायत समिती सभापतीपदी भाजपचे उत्तम चव्हाण तर उपसभापतीपदी शिवसेनेच्या गयाबाई घोडे यांची निवड झाली.