शहीद भगतसिंह क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

महाराष्ट्र टाइम्स

शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित ३३ व्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन कॉस्मो फिल्म्सचे उपाध्यक्ष संजय चिंचोलीकर यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत कॉस्मो फिल्म्स संघाने जॉन्सन संघावर विजय मिळवला. तसेच एआयटीजी संघाने गुड इअर संघावर मात केली. स्पर्धेचे आयोजन उत्साहात पार पडले.

शहीद भगतसिंह क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित आणि कॉस्मो फिल्मस् प्रायोजित ३३ व्या शहीद भगतसिंह क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन कास्मो फिल्मसचे उपाध्यक्ष संजय चिंचोलीकर यांच्या हस्ते शुक्रवारी (१३ मार्च) एमजीएम क्रीडा संकुलावर झाले.

या प्रसंगी शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण साक्रूडकर तसेच मंडळाचे उपाध्यक्ष दामोदर मानकापे, कोषाध्यक्ष भगवान भोजने, जॉन्सन अँड जॉन्सनचे व्यवस्थापक अतुल बोरसे, ज्येष्ठ क्रिकेट खेळाडू अशोक सातपुते, वरिष्ठ प्रशिक्षक विनोद माने, आत्माराम गव्हाणे, विठ्ठल सांगळे, अरुण दाणी, सागर शेवाळे, राजेश कीर्तीकर, अमरदीप असोलकर आदींची उपस्थिती होती. दरम्यान, शुक्रवारी उद्घाटनप्रसंगी झालेल्या पहिल्या सामन्यात कॉस्मो फिल्मस् संघाने जॉन्सन संघावर ४९ धावांनी विजय मिळवला, तर दुसऱ्या सामन्यात एआयटीजी संघाने गुड इअर संघावर ४ गडी राखून विजय संपादन केला. आजच्या दोन्ही सामन्यांची पंचाची भूमिका अजय देशपांडे, विष्णू बब्बीरवार, हसन जमा खान, सुनील बनसोडे, तर गुणलेखनाची भूमिका किरण भोळे यांनी पार पाडली, असे संयोजन समितीचे सदस्य व मंडळाचे उपाध्यक्ष दामोदर मानकापे यांनी कळवले आहे. स्पर्धेसाठी संयोजक समितीतर्फे गंगाधर शेवाळे, राजेश सिद्धेश्वर, अनंत नेरळकर, उदय बक्षी, सागर वैद्य, संदीप भंडारी, राकेश सूर्यवंशी, डॉ. प्रशांत याकुंडी, जितेंद्र बरंजाळेकर, योगेश मानकापे, प्रथमेश वैद्य आदी पुढाकार घेत आहेत.