शिका सूत्रसंचालन, डबिंगचे तंत्र

महाराष्ट्र टाइम्स

मनोरंजन क्षेत्रात आवाजाच्या कलाकारांची मागणी वाढत आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब' आणि 'फिल्म सिटी मीडिया'तर्फे 'कमर्शियल व्हॉइसिंग, डबिंग आणि ऑडिओबुक'चा विशेष अभ्यासक्रम सुरू होत आहे. हा अभ्यासक्रम दोन महिने चालणार असून, तज्ज्ञ कलाकार मार्गदर्शन करतील. यातून आवाजाच्या क्षेत्रात अर्थार्जन करण्याची संधी मिळेल. मर्यादित जागा असल्याने नावनोंदणी आवश्यक आहे.

शिका सूत्रसंचालन, डबिंगचे तंत्र
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

झपाट्याने विस्तारणाऱ्या मनोरंजन क्षेत्रात चांगला आवाजा देणाऱ्या कलाकारांची मागणी वाढत आहे. आपला आवाज चांगला असूनही व्यावसायिक व्हॉइसिंग आणि डबिंग कसे करावे, व्यावसायिक सूत्रसंचालन कसे करावे, कोणाला संपर्क करावा, अशा प्रश्नांची पुरेशी माहिती नसते. ही बाब लक्षात घेऊन, ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’ आणि ‘फिल्म सिटी मीडिया’तर्फे ‘कमर्शियल व्हॉइसिंग, डबिंग आणि ऑडिओबुक’चा विशेष अभ्यासक्रम घेतला जाणार आहे. याद्वारे आवाजाच्या क्षेत्रातील तंत्र नागरिकांना आत्मसात करता येणार आहे.

अत्याधुनिक स्टुडिओ प्रशिक्षण केंद्रांची निर्मिती करून, सुमारे २६ हून अधिक वर्षे तंत्रशद्ध प्रसिद्धी देणाऱ्या ‘फिल्मसिटी मीडियाज्’च्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील व्यावसायिक स्टुडिओमध्ये हा विशेष प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहे. प्रसिद्ध निवेदक आणि अभिनेते विघ्नेश जोशी, दिग्दर्शक आशिष नेवाळकर, वेबसीरीजसाठी डबिंग करणारे प्रसिद्ध डबिंग आर्टिस्ट किशोर पूरकर आणि कार्टून फिल्म डबिंग आर्टिस्ट अमोल मोरे हे तज्ज्ञ कलाकार मार्गदर्शन करणार आहेत. १५ ते ७५ या वयोगटातील व्यक्तींना हा अभ्यासक्रम करता येणार असून, आवाजाच्या क्षेत्रात अर्थार्जन करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

कर्वेनगर येथील पंचम स्टुडिओ आणि वाकड येथील वेस्टर्न म्युझिक स्टुडिओ येथे दोन महिने दर रविवारी हा अभ्यासक्रम होणार आहे. प्रवेश घेणाऱ्या व्यक्तींना प्रमाणपत्रासह मोफत व्हॉइस अल्बम आणि डबिंग इंडस्ट्रीमध्ये काम मिळवण्यासाठी मार्गदर्शन मिळणार आहे. मर्यादित जागा असून, नावनोंदणी आवश्यक आहे. संपर्क : ८४२२९९६७२४, ९०८२८७११६२ किंवा ई-मेल filmcitymediazindia@ gmail.com