स्त्री परिचरांचे मानधन दुप्पट

महाराष्ट्र टाइम्स

सार्वजनिक आरोग्य विभागातील अंशकालीन स्त्री परिचरांचे मानधन दुप्पट होणार आहे. आता त्यांना दरमहा सहा हजार रुपये मिळतील. ही वाढ १ एप्रिल २०२६ पासून लागू होईल. दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी या परिचर महत्त्वपूर्ण काम करतात. त्यांच्या कामाची दखल घेऊन मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

doubling of female health workers salaries a major change in health services

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य उपकेंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या अंशकालीन स्त्री परिचरांचे मासिक मानधन तीन हजार रुपयांवरून सहा हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ एप्रिल २०२६पासून ही वाढ लागू होणार आहे.

आरोग्य उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचर या गाव पातळीवर, आदिवासी, दुर्गम, डोंगराळ भागात प्राथमिक आरोग्यसेवा तळागाळापर्यंत नेण्यासाठी मदत करतात. आरोग्य विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्यविषयक कार्यक्रमांचा लाभ प्रत्येक कुटुंबापर्यंत नेण्यात त्या महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या कामाचे स्वरूप पाहता त्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी लोकप्रतिनिधी तसेच संघटनांकडूनही होत होती.