The Biggest Land Record Scam In The State Revealed
सातबाऱ्यात बदल करून घोटाळा
Contributed by: मुंबई|महाराष्ट्र टाइम्स•
महसूल खात्यात आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा झाल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत सांगितले. शुद्धलेखनाच्या नियमाखाली सातबारा उताऱ्यात बदल करून एक ते दीड लाख शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार धक्कादायक असून यावर आता कारवाई केली जाईल.
महसूल खात्यात आतापर्यंतच्या इतिहासात सर्वांत मोठा घोटाळा झाल्याची कबुली महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत बुधवारी दिली. विभागात शुद्धलेखनात बदल करण्याच्या नियमाखाली चक्क सातबारा उताऱ्यातच बदल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राज्यातील तब्बल एक ते दीड लाख शेतकऱ्यांची अधिकाऱ्यांनी फसवणूक केल्याची कबुली बावनकुळेंनी दिली.