गुढीपाडव्याच्या निमित्ताने ठाणे शहरात नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले असून, यंदा या यात्रेचे २६ वे वर्ष आहे. “श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास” यांच्या वतीने आयोजित या यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे.
गुरुवारी सकाळी ७ वाजता या स्वागत यात्रेला सुरुवात होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून यात्रा पुढे मार्गस्थ होईल.
या यात्रेत यंदा ५० हून अधिक चित्ररथ सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे महिलांची पारंपरिक वेशभूषेतील बाइक रॅली, तसेच तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग ही यंदाच्या ठाण्यातील स्वागतयात्रेची विशेष आकर्षणे ठरणार आहेत.







