चेंबरमध्ये गुदमरून चौघांचा मृत्यू

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
four die of asphyxiation in ujjain hotel two treated
उज्जैन : मध्य प्रदेशातील उज्जैन शहरामधील एका खासगी हॉटेलमधील ‘फूड वेस्ट प्लांट’चे चेंबर साफ करताना गुदमरल्याने चार जणांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी रविवारी सांगितले.

ही घटना शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास उज्जैन-देवास मार्गावरील श्रीगंगा हॉटेलमध्ये घडली. कमलेश तांबोली, नितीन वाल्मीक, मनोज मीना आणि वाहिद अशी मृतांची नावे आहेत. त्यांना वाचवण्यासाठी त्या कक्षात गेलेल्या इतर दोन व्यक्तींनाही त्रास झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. कामगार चेंबरमध्ये साफसफाईसाठी गेले होते, की चुकून त्यात पडले, याचा शोध सुरू आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली.