डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने बीए शिक्षणशास्त्र, बीए योगशास्त्र, योग शिक्षकांसाठीचा फाउंडेशन असे विविध अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे. विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने चार वर्षांचे ऑनर्स पदवी अभ्यासक्रम सुरू केले आहेत. नऊ विभागांमध्ये ॲप्रेंटिसशिप संलग्न पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले.
अधिसभेच्या बैठकीत यासह विविध अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली. यामध्ये बीएस्सी जिओईनफॉर्मटिक्स, बीएस्सी केमेक्ट्री, बीएस्सी स्टॅटिक्स विथ डेटा अ ॅनॉलिसीस, बीएस्सी प्रिंटिंग व पॅकेजिंग टेक्नॉलॉजी; तसेच धाराशीव उपपरिसरात बीबीए अ ॅग्रो बिझनेस मॅनेजमेंट अशा पदवी विषयांचा समावेश आहे. दिनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्रात बीटेक मेकॅट्रॉनिक्स इंजिनीअरिंग हा चार वर्षांचा अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली. मानसशास्त्र विभागात एमए रिहॅबिलेशन सायकॉलॉजी, क्लिनकल सायकॉलॉजी व या विषयावरील दोन पदविका अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली. बैठकीत २४ विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला. विद्यापीठाशी संलग्नित, स्वायत्त अशासकीय महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अराजपत्रित अधिकारी समजण्यात यावे, यासह करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम शिबिरास विनाकारण गैरहजर राहणाऱ्या प्राचार्य व संस्थाचालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याबाबत समज देण्यात येईल, यास प्रस्तावांसह बैठकीत २४ विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेतला.