‘जनादेशात भेसळ’

Contributed by: नवी दिल्ली,वृत्तसंस्था|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘जनादेशात भेसळ’
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या संचालक मंडळावर चार सरकारनियुक्त सदस्यांच्या नेमणुकीवरून राज्यात निर्माण झालेल्या राजकीय वादंगाला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी धार दिली आहे. राज्य सरकारचा निर्णय हा ‘जनादेशात भेसळ’ करणारा आहे, अशी टीका राहुल यांनी गुरुवारी ‘एक्स’द्वारे केली.

‘गोकुळमध्ये दूध उत्पादकांनी भाजपचा पराभव केला. त्यामुळे निवडणुकीनंतर त्यांनी नियम बदलले. चार संचालक घुसवून आपली संख्या १२ वरून १६वर नेली आणि बहुमत चोरले. ही दूध उत्पादकांच्या मतांची चोरी आहे. जनादेशात भेसळ आहे,’ अशी टीका राहुल यांनी केली.
‘गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी दिलेला कौल डावलून सत्ता मिळवण्यासाठी महायुती सरकारने कायद्यात बदल केला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर बहुमत आपल्या बाजूने वळवण्यासाठी सरकारी सदस्य नियुक्तीचा निर्णय घेणे हा लोकशाहीचा आणि सहकार क्षेत्राचा अपमान आहे,’ अशी टीका काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी केला.

 संबंधित वृत्त...४