आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर

Contributed by: लिस्बन (पोर्तुगाल),वृत्तसंस्था|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर
अवघ्या फुटबॉलविश्वाला गारूड घालणारा पोर्तुगालचा स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो याने गुरुवारी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम दिला. मात्र, तो क्लब स्तरावर फुटबॉल खेळताना चाहत्यांना दिसणार आहे.

सौदी अरेबियातील अल-नासर क्लबसोबत या मोसमाच्या शेवटी तो आपली क्लब कारकीर्दही संपवेल, असे बोलले जात आहे. तो सध्या आपल्या कारकिर्दीतील एक हजाराव्या गोलच्या टप्प्याजवळ असून, सध्या त्याच्या नावावर ९८५ गोल आहेत. त्यापैकी विक्रमी १४६ गोल त्याने पोर्तुगालकडून खेळताना केले आहेत. मेस्सीनेही नुकतीच निवृत्ती जाहीर केली.
 सविस्तर वृत्त...१०