महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सहाय्यक सुरक्षा अधिकारी भगवान वत्रे, सुनिल होरंबे, नागेश येरूणकर व आनंदा जाधव हे मुख्य प्रवेशद्वारावर गस्त घालत असताना एक पर्यटक तरुणासोबत वाद घालत असताना दिसला. जवानांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली. आकाश सरदार या तरुणाने दिलेली तिकिटे फाटलेली असल्याची तक्रार केली. ही तिकिटे दरापेक्षा २० रुपये अधिक घेऊन त्याची विक्री करण्यात आली होती. जवानांनी त्याच्याकडील तिकिटे काऊंटरवरून नेऊन तपासली असता ती बनावट आढळली. आकाश सरदार याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.