Notice To Three Thousand Hut Dwellers In Kurla trombe Area
तीन हजार झोपडीधारकांना नोटीस
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
मध्य रेल्वेच्या अखत्यारित असलेल्या ज्या जमिनींवर अतिक्रमण झाले आहे, त्यात कुर्ला-ट्रॉम्बे परिसराचा समावेश आहे. ३७.२९ हेक्टरवर अनधिकृतपणे बांधकाम उभारण्यात आले आहे. कुर्ला-ट्रॉम्बे परिसरासह मानखुर्द आणि कुर्ला येथेही मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. यातील अनेक बांधकामे धोकादायक क्षेत्रात येतात. रेल्वे प्रशासनाने कुर्ला-ट्रॉम्बे मार्गावरील ३,१५४ झोपडपट्टीधारकांना नोटीस बजावली आहे. १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत ही घरे स्वतःहून रिकामी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एक महिन्याची मुदत संपल्यावर रेल्वे प्रशासनाकडून कारवाई केली जाईल, याबाबतच्या सूचना मुंबई उच्च न्यायालयाने दिल्या आहेत.