शरद पवार रुग्णालयात दाखल

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
sharad pawar admitted to hospital condition stable
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना सोमवारी सायंकाळी रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून, तपासणी अहवालानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. पवार यांचा दुष्काळी भागातील पाहणी दौराही रद्द करण्यात आला आहे.

‘श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांची सीटी स्कॅन तपासणी करण्यात आली. सध्या त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तपासणी अहवालानुसार उपचारांमुळे त्यांची प्रकृती सुधारण्याची अपेक्षा आहेे,’ अशी माहिती रुबी हॉलचे डॉ. परवेझ ग्रँट यांनी दिली.