मारुतीची वाडीला अंगणवाडी केंद्र

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
मारुतीची वाडीला अंगणवाडी केंद्र
घोटी : इगतपुरी तालुक्यातील कुरुंगवाडी ग्रामपंचायत पैकी मारुतीचीवाडी या ठिकाणी अखेर अंगणवाडी केंद्र सुरू झाले आहे. यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेने आंदोलन केले होते. या केंद्राचे उद्घाटन संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला बालविकास प्रकल्पाधिकारी भारती गजगे, तानाजी कुदळे आदी उपस्थित होते.

शेतीसाठी दोन
आवर्तनांची मागणी

मालेगाव : दुष्काळी स्थिती पाहता राज्य शासन व पाटबंधारे विभागाने मालेगाव शहरासाठी गिरणा डॅममधून पूर्ण क्षमतेने पाणी उचलून चणकापूर धरणाचे पाणी गिरणा खोऱ्यातील शेतीच्या रब्बी पिकासाठी दोन आवर्तने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रा. के. एन अहिरे यांनी केली आहे.