पालिकेच्या कारभाराची चौकशी करा

Contributed by: छत्रपती संभाजीनगर,म. टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
committee should be formed to investigate municipal corporations functioning
पालिकेबाहेरील वरिष्ठ अधिकाऱ्यांची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी समिती गठित करावी.

वर्ष २०२१ पासून महानगरपालिकेच्या आर्थिक व्यवहारांचे विशेष ऑडिट करावे.
५८० कोटींच्या भूमिगत ड्रेनेज प्रकल्पाचे स्वतंत्र आर्थिक व तांत्रिक ऑडिट करावे.

शहरात ५८० कोटी रुपयांच्या भूमिगत ड्रेनेज प्रकल्प राबविण्यात आला. या प्रकल्पामध्ये अनेक अनियमितता झाल्याचा आरोप महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला आहे. तसेच गंगापूर विधानसभेचे आमदार प्रशांत बंब यांनीही महापालिकेच्या निधी वापराबाबत आक्षेप नोंदविला आहे. याशिवाय जून २०२५ पासून शहरात अतिक्रमण हटाव कारवाईमधील अधिकारांचा गैरवापर झाल्याचा आरोप करून महापालिकेच्या कारभाराची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या (एसडीपीआय) पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

‘एसडीपीआय’चे प्रदेश महासचिव सय्यद कलीम, समीर शाह, मोहसीन खान, हाफिज अबुजर पटेल, रियाज सौदागर, सय्यद सिराज, समीर पटेल, आरेफ देशमुख, शेख फुरकान, सोहेल तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी ‘एसडीपीआय’च्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून महापालिकेच्या आर्थिक व प्रशासकीय कामकाजातील कथित अनियमिततांबाबत सविस्तर चौकशी करण्याची मागणी केली.

अशा आहेत मागण्या

पालिकेबाहेरील वरिष्ठ अधिकाऱ्यांची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी समिती गठित करावी.

वर्ष २०२१ पासून महानगरपालिकेच्या आर्थिक व्यवहारांचे विशेष ऑडिट करावे.

५८० कोटींच्या भूमिगत ड्रेनेज प्रकल्पाचे स्वतंत्र आर्थिक व तांत्रिक ऑडिट करावे.

जून २०२५ पासून सर्व अतिक्रमण हटाव कारवाईंची चौकशी करावी.