मेष : व्यावसायिकांना प्रगतीसाठी स्पर्धात्मक परिस्थितीस सामोरे जावे लागेल. नोकरीधंद्यातील वादविवाद प्रयत्नपूर्वक टाळा.वृषभ : नोकरीधंद्यातील कामाचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यावर भर द्या. आर्थिक उलाढालीचा वेग मंदावेल.
मिथुन : व्यवसायास नवी कलाटणी देण्यात भागिदारांचे सहकार्य लाभेल. व्यावहारिक पातळीवर प्रगतीचा मार्ग समोर दिसेल.
कर्क : देण्याघेण्याचे व्यवहार आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक पातळीवर नवी जबाबदारी स्वीकारावी लागेल.
सिंह : आचरणशैलीत बदल करणे अगत्याचे आहे. नोकरीधंद्यातील पतप्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करा.
कन्या : कौटुंबिक खर्चाचा भार वाढणार आहे. आर्थिक जबाबदारीचे योग्य नियोजन करा.
तुळ : समतोल कार्यप्रणालीने सर्वांची मने जिंकून घ्याल. मनःसामर्थ्याची प्रचिती विरोधकांना येईल.