Contributed by: छत्रपती संभाजीनगर,म. टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने स्थाननिश्चितीसाठी पात्र प्राध्यापकांकडून प्रस्ताव मागविले आहेत. विद्यापीठाने प्राचार्यांना दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे, अनुदानित महाविद्यालयातील पात्र शिक्षकांच्या स्थान- १३ ए व स्थान- १४ च्या स्थाननिश्चितीसाठी पात्र अध्यापकांनी प्रस्ताव सादर करावेत. विद्यापीठातील मालविय शिक्षक प्रशिक्षण केंद्रात १८ नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याची मुदत विद्यापीठाने दिली आहे.