‘नियमित’ प्रवाशांना लाभ

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
benefit for regular passengers traveling from mumbai to tirupati
मुंबई ते तिरुपती प्रवासादरम्यान सुमारे ३,५०० रुपयांचा टोल खर्च वाचल्याचे खासगी पर्यटन कंपनीचे ओमनाथ नाटेकर यांनी सांगितले. ‘३,०५० रुपयांच्या पासवर एका प्रवासातच ३,५०० रुपयांची सवलत मिळाली. वर्षभरात २०० टोल फेऱ्यांपर्यंत सुविधा मिळणार असल्याने नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी हा पास अत्यंत फायदेशीर आहे,’ असे ते म्हणाले. मुंबई-गोवा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांनाही या पासचा लाभ घेता येऊ शकतो.