Burglary Incidents In Nashik Fifty Thousand Rupees Stolen
घरफोडीत लांबवले पन्नास हजार रुपये
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नाशिक: समृद्धी रुग्णालयामागील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने ५० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी दत्तू नारायण कानमहाले (रा. स्वामी समर्थ नगर) यांनी आडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ३० ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यान ही घरफोडी झाली.
रोकड लंपासनाशिक: साईनाथनगर येथील जनसेवा मेडिकलचे शटर उचकटून चोरट्याने ड्रॉव्हरमधील ४२ हजार रुपयांची रोख रक्कम लांबवली. याप्रकरणी प्रसाद बापूराव कोठावदे (रा. इंदिरानगर) यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
चंदन झाडाची कत्तल
नाशिक: कामटवाडा येथील मातोश्री बंगल्याच्या आवारातील चंदनाचे झाड कापून अज्ञात चोरट्याने खोड पळवून नेले. याप्रकरणी प्रसाद देविदास मटाले (रा. कामटवाडा) यांनी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. एक सप्टेंबरच्या रात्री हा प्रकार घडला.
कारची काच फोडली
नाशिक : सातपूर एमआयडीसीत पार्क केलेल्या कारच्या डिक्कीची काच फोडून लॅपटॉप व ७५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्याने लांबवली. या प्रकरणी ज्ञानेश्वर मुरलीधर पाटील (रा. पंचवटी) यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. एक सप्टेंबर रोजी ही घटना घडली.
सासरच्यांवर गुन्हा
नाशिक : विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ करून १५ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने बळकावल्याप्रकरणी पती अमोल अनंत भावसार व सासरच्या मंडळींवर मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तरुणाला मारहाण
नाशिक : जुन्या भांडणाची कुरापत काढून सातपूर एमआयडीसीतील संतोषी मातानगर येथे तरुणाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी तुकाराम दगडू शिंगाडे (रा. सातपूर) यांच्या तक्रारीवरून लखन वाघमारे व दिघ्या बोबले यांच्याविरोधात सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक : इंदिरानगर येथील रथचक्र चौकातील अमर प्लाझा इमारतीच्या बेसमेंटमध्ये उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. धीरज कमलाकर फेगडे (रा. इंदिरानगर) यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ३० ऑगस्ट रोजी ही चोरी झाली.