Citilink Bus Breaks Down On The Road Traffic Halted
सिटीलिंक रस्त्यातच बंद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
सातपूर : गुरुवारी (दि. ३) दुपारी दीड वाजेच्या सुमारास सावरकरनगर येथील ‘आनंद छाया’च्या वळणावर सिटीलिंक बस रस्त्यातच बंद पडली. भर रस्त्यात बस उभी राहिल्याने इतर वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला. तांत्रिक कारणामुळे बस बंद पडल्याचे चालकाकडून सांगण्यात आले. यामुळे काही वेळ इतर वाहनांची गैरसोय झाली.