Demand For A Week long Ban On Meat Sales During Jain Festival
‘आठवडाभरासाठी मांसविक्री बंद करा’
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
जैन धर्मातील पर्युषण महापर्वाच्या काळात मिरा-भाईंदर मध्ये दरवर्षी दोन दिवस मांसविक्री बंद ठेवली जाते. मात्र, यंदा ८ ते १६ सप्टेंबरदरम्यान, म्हणजे आठवडाभर मांस व मटणविक्रीची दुकाने बंद ठेवावीत, अशी मागणी भाजप नगरसेवकाने मिरा-भाईंदर महापालिका आयुक्ततांकडे पत्राद्वारे केली आहे.
जैन धर्मातील महत्त्वाच्या पर्युषण महापर्वाला यंदा ८ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून १६ सप्टेंबरला त्याची समाप्ती होणार आहे. या कालावधी जैन समाजाच्या धार्मिक भावना दुखावू नयेत, ही बाब लक्षात घेऊन यंदा संपूर्ण पर्युषण पर्वाच्या कालावधीत मांसविक्री आठवडा बंद ठेवावी, अशी मागणी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक भरत कोठारी यांनी केली आहे. यावर महापालिका काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.