Farmers Vehemently Oppose Manikdoh Tunnel Anger Over Cabinet Decision
माणिकडोह बोगद्याला विरोध कायम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
मंचर : उत्तर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असतानाही मूळ कुकडी प्रकल्पात समाविष्ट नसणाऱ्या डिंभे धरण ते माणिकडोह धरण बोगद्याला नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आल्याने या निर्णयाविरोधात संतापाची लाट पसरली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर लगेचच आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे; तर दुसरीकडे शेतकरी या निर्णयाच्या विरोधात आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहेत. या निर्णयानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला असून पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.