गिधाडांची संख्या धोकादायक पातळीवर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
गिधाडांची संख्या धोकादायक पातळीवर
चंद्रपूर : गिधाडांच्या संख्येत घट होण्यामागे केवळ डायक्लोफेनाकसारखी औषधेच कारणीभूत नसून, एव्हियन मलेरियासारखे संसर्गजन्य आजार व भूकबळीच गिधाडांच्या मृत्यूचे महत्त्वाचे कारण ठरल्याचे सत्य जाणकारांनी मांडले आहे. मागील सुमारे २० वर्षात मलेरियाने शेकडो गिधाडांचा बळी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच गिधाडांच्या योग्य संवर्धनासाठी ठोस उपाय न झाल्याने त्यांचे अस्त ित्वच धोक्यात आले आहे. परिणामी, ती जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

आज ५ सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय गिधाड जनजागृती दिन. भारतात गेल्या २० वर्षांपर्यंत गिधाडांची संख्या चांगली होती; परंतु गेल्या काही वर्षांत त्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. आता गिधाडे भारतातून नामशेष होणार की काय, अशी भीती पक्षीप्रेमींना वाटते आहे. जनावरे मेल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात गिधाड मृत जनावरांचे मांस फस्त करतात. जनावरांचा केवळ सांगाडा शिल्लक राहतो. त्यामुळे मृत जनावरांची विल्हेवाट लागते. त्यामुळेच त्यांना सफाई कामगार म्हटले जाते. गेल्या काही वर्षांपासून निरनिराळ्यांनी संसर्गजन्य आजारांनी त्यांची संख्या घटली; त्यातच भूकबळींची भर पडली आहे. गडचिरोलीतील संकटग्रस्त गिधाडांच्या मृत्यूमध्ये पक्ष्यांना होणाऱ्या मलेरियाचा मोठा वाटा होता. चंद्रपूर-गडचिरोलीातील घनदाट जंगलात पक्षीतज्ज्ञ डॉ. अजय पोहरकर यांच्या नेतृत्वाखाली अभ्यास करण्यात आला. राज्यात प्रामुख्याने पांढऱ्या पाठीची, लांब चोचीची आणि पातळ चोचीच्या प्रजातीची गिधाडे आढळतात. आता त्यांची संख्या कमालीची घटली आहे.
नियम ित होणाऱ्या नोंदींवरून राज्यात सुमारे शंभर गिधाडेच उरली आहेत, असे स्पष्ट होते. राज्यातील सीमावर्ती भागातील गिधाडे इकडून-तिकडे जाणे-येणे करतात. राज्यात गडचिरोली जिल्ह्यात सर्वाध िक गिधाडे असून, चंद्रपूरसह कोकणातही त्यांनी नोंद आढळते. राज्यातील अन्य भागात गिधाडांची संख्या वाढावी यासाठीदेखील प्रयत्न होणे गरजेचे आहे; परंतु तसे दिसत नाही.