इंजिनीअरची फसवणूक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
cyber fraud of 359 lakhs of engineer in thane
क्रेडिट कार्डवरील ९ हजार ८०० रुपयांचे रिवॉर्ड पॉइंट रिडीम करून देण्याचे आमिष दाखवत सायबर गुन्हेगारांनी ठाण्यातील एका आयटी इंजिनीअरची ३ लाख ५९ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

घोडबंदर परिसरात राहणाऱ्या आयटी इंजिनीअरला एका व्यक्तीने फोन करून तो बँकेचा अधिकारी असल्याचे सांगितले. तुमच्या क्रेडिट कार्डवर ९ हजार ८०० रुपयांचे रिवॉर्ड पॉइंट जमा असून ते रिडीम करता येतील, असे सांगून त्याने ऑनलाइन प्रक्रिया करण्यासाठी मोबाइलवर एक लिंक पाठवली. इंजिनीअरने या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांच्या क्रेडिट कार्डवरून पहिल्यांदा १ लाख ६९ हजार ९९० रुपये, तर दुसऱ्या वेळी १ लाख ९९ हजार रुपये वजा झाले. ही बाब लक्षात येताच इंजिनीअरने ऑनलाइन पोर्टलवर तक्रार नोंदवली. त्यानंतर कासारवडवली पोलिस ठाण्यात तक्रार दिली.