भारत-जपान लढत आज

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
india japan cricket match key clash in asian sports championship
नागोया : गेल्या आठवड्यात दुबईमध्ये विक्रमी आठवे आशिया कप क्रिकेट जेतेपद पटकावल्यानंतर हरमनप्रीत कौरची टीम इंडिया आज, शुक्रवारपासून आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक राखण्याच्या मोहिमेस सुरुवात करत आहे. गतविजेता भारतीय महिला क्रिकेट संघाची उपांत्यपूर्व फेरीत यजमान जपानशी गाठ पडणार आहे.

न खेळताच आगेकूच
बांगलादेश महिला क्रिकेट संघ मैदानावर न उतरताच आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाला, तर पाकिस्तानला थायलंडसारख्या नवख्या संघाविरुद्ध विजय नोंदवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. गुरुवारी बांगलादेशचा चीनविरुद्धचा उपांत्यपूर्व सामना ओल्या मैदानामुळे रद्द करण्यात आला. उच्च आंतरराष्ट्रीय क्रमवारीच्या आधारे बांगलादेशने उपांत्य फेरी गाठली. आयसीसी टी-२० क्रमवारीत बांगलादेश १०व्या, तर चीन ३६व्या स्थानावर आहे.