चीन, पाकचा शांतता प्रस्ताव

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

चीन आणि पाकिस्तानने पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाच कलमी प्रस्ताव दिला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांची सुरक्षित वाहतूक व्हावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान इसहाक डार यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी चर्चा केली. अमेरिका आणि इराणमधील संघर्ष थांबवण्यासाठी चर्चेला प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला आहे.

china and pakistan propose five point peace plan

पश्चिम आशियातील संघर्ष थांबवण्यासाठी चीन आणि पाकिस्तानने पाच कलमी शांतता प्रस्ताव मांडला असून, आखाती प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्याचे आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीचे आवाहन केले आहे.

पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इसहाक डार यांनी बीजिंगचा एकदिवसीय दौरा केला. यावेळी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मंगळवारी हा प्रस्ताव मांडण्यात आला. या दोन्ही नेत्यांनी आखाती आणि पश्चिम आशियातील परिस्थितीचा आढावा घेतला. डार यांनी तुर्की, इजिप्त आणि सौदी अरेबियाच्या परराष्ट्रमंत्र्यांशी झालेल्या संवादाची माहिती वांग यी यांना दिली. या चर्चेत अमेरिका आणि इराणदरम्यान सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी चर्चेला प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला आहे.