संघर्षापूर्वी होर्मुझ सामुद्रधुनीतून दररोज शंभरहून अधिक जहाजे जात होती. त्यातील अनेक आशियाला तेल वाहून नेत होती. शस्त्रसंधी लागू झाल्यानंतरही येथून केवळ १२ जहाजे गेल्याची नोंद आहे. बोत्स्वाना ध्वजांकित द्रवरूप नैसर्गिक वायूवाहू जहाजाने रेव्होल्युशनरी गार्डने निर्देशित केलेल्या मार्गाने पर्शियन आखातातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, परंतु शुक्रवारी पहाटे हे जहाज अचानक माघारी फिरले. जहाज-ट्रॅकिंग डेटावरून हे दिसून आले. ‘सुमारे २३० तेलवाहू जहाजे सामुद्रधुनीतून मार्गस्थ होण्याची वाट पाहत आहेत आणि त्यांना कोणत्याही अटींशिवाय या मार्गावरून जाण्याची परवानगी दिली पाहिजे,’ असे संयुक्त अरब अमिरातीच्या प्रमुख तेल कंपनीचे प्रमुख सुलतान अल-जाबेर यांनी सांगितले.
अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी झाला असला तरी शनिवारी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे होणाऱ्या दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाच्या चर्चेवर चिंतेचे सावट निर्माण झाले आहे.
इराणने आमच्या भूभागावर हल्ले केल्याचा दावा कुवेत आणि सौदी अरेबिया यांनी केला, तर लेबनॉनवरील हल्ले थांबत नाहीत तोपर्यंत वाटाघाटी होऊ शकत नाही, अशी भूमिका इराणने घेतली. ‘त्यावर आमच्याशी जास्त खेळू नका,’ असा इशारा अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी चर्चेसाठी इस्लामाबादला रवाना होण्यापूर्वी इराणला दिला.
लेबनॉनवरील हल्ले, होर्मुझ सामुद्रधुनीची कोंडी या घडामोडींबाबत आपापल्या भूमिकांवर ठाम राहणाऱ्या इराण आणि अमेरिका, इस्रायल यांच्यात शनिवारी इस्लामाबादमध्ये चर्चा होणार आहे. त्यासाठी पाकिस्तानने जय्यत तयारी केली आहे. मात्र, तत्पूर्वी शुक्रवारी दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या.
इराण आणि त्याच्या समर्थक देशांनी आपल्या भूभागाला ड्रोनद्वारे लक्ष्य केल्याचा आरोप कुवेतने केला आहे, तर ताज्या हल्ल्यांमुळे आपल्या देशातील एका महत्त्वाच्या तेलवाहिनीचे नुकसान झाल्याचा दावा सौदी अरेबियाने केला.
‘इस्रायलने लेबनॉनमधील हल्ले थांबवले नाहीत, तर शनिवारी वाटाघाटी होऊच शकत नाहीत,’ अशी इराणची भूमिका असल्याचे वृत्त ‘तस्नीम’ या इराणच्या अर्धसरकारी वृत्तसंस्थेने दिले आहे, तर ‘होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांच्या विनाशुल्क वाहतुकीला परवानगी न देणारा इराण अत्यंत वाईट काम करत आहे,’ असा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.
संबंधित वृत्त... फ्रंट पेज २