मुंबई : ‘ शिवसेना ‘उबाठा’च्या खासदारांना गळाला लावून ‘ऑपरेशन टायगर’ करण्यात येणार असल्याच्या वृत्तात तथ्य नसून, ही निव्वळ अफवा आहे’, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. दुसरीकडे, शिवसेना उबाठा खासदार अरविंद सावंत यांनीही खासदारफुटीचे वृत्त फेटाळले.
सविस्तर वृत्त... ८
‘एचआर’ला कोठडी
नाशिक : आठ तरुणींसोबत लैंगिक जवळीक साधून एकीवर अत्याचार करीत तिच्यासह एका तरुणाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झालेल्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीच्या ‘एचआर’ आश्विनी चैनानी (वय ५१) हिला नाशिक पोलिसांनी पुणे येथून अटक केली. तिला नाशिक जिल्हा न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, उर्वरित पाच पुरुष संशयितांची रवानगी नाशिकरोड कारागृहात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त... ८
भूमिपूजन मे महिन्यात
छत्रपती संभाजीनगर : श्री क्षेत्र तुळजापूर (जि. धाराशिव) येथील कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिर विकासकामांचे भूमिपूजन मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत विकासकामांचा आरंभ होईल. सरकारने मंदिर परिसर विकासकामांसाठी १८६५ कोटींचा विकास आराखडा मंजूर केला आहे. त्याची अंमलबजावणी मे महिन्यापासून होणार आहे, अशी माहिती धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतीच मुंबईत दिली.
सविस्तर वृत्त... ३
तारीख पे तारीख
छत्रपती संभाजीनगर : अधिकाधिक सुरक्षित रक्त व रक्तघटक मिळण्याच्या हेतुने नॅट चाचणीची सुविधा घाटीसह राज्यातील पाच ते सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये मंजूर होऊन किमान दीड ते दोन वर्षे लोटली आहेत. मात्र अद्यापही या सुविधेला मुहूर्त नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सविस्तर वृत्त...‘टाइम्स’मध्ये




