प्रफुल पटेल यांच्या पत्रावरूनच ठिणगी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

प्रफुल पटेल यांच्या १६ फेब्रुवारीच्या पत्राने वादाला सुरुवात झाली. या पत्रात पक्षाचे अधिकार राष्ट्रीय कार्याध्यक्षांकडे असल्याचे म्हटले आहे. यामुळे संभ्रम निर्माण झाला. सुनेत्रा पवार यांनी १० मार्चला आयोगाला पत्र लिहून पूर्वीचा पत्रव्यवहार रद्द करण्यास सांगितले. मात्र, यामुळे सुनेत्रा पवार यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.

pratul patels letter sparked controversy for sunetra pawar

या सगळ्या वादामागे प्रफुल पटेल यांनी १६ फेब्रुवारीला निवडणूक आयोगाला दिलेले एक पत्र असल्याचे बोलले जाते.

या पत्राची प्रत अद्याप बाहेर आली नसली तरी सुनेत्रा पवार समर्थकांच्या म्हणण्यानुसार या पत्रात पटेल यांनी निवडणूक आयोगाला माहिती देताना पक्षातील सगळे अधिकार राष्ट्रीय कार्याध्यक्षांकडे असतील, असे म्हटले आहे. त्यातूनच संभ्रम निर्माण झाल्याने सुनेत्रा पवार यांनी १० मार्च रोजी आयोगाला दिलेल्या पत्रात त्यांच्या पत्रापूर्वी आयोगाकडे केलेला सगळा पत्रव्यवहार रद्दबातल समजावा, असे खास नमूद केले आहे. मात्र, पटेल व तटकरे समर्थकांच्या म्हणण्यानुसार असे म्हटल्याने सुनेत्रा पवार यांना ज्या विशेष अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडले व त्यासाठी जी नोटीस जारी करून २९३ सदस्यांना यासाठी निमंत्रित केले गेले तेही रद्दबातल होऊन सुनेत्रा पवार यांच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.