कळवण तालुक्यात शेतकरी आत्महत्या

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

कळवण तालुक्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. शेतमालाला योग्य भाव मिळाला नाही. कर्जाच्या ओझ्याखाली दबून प्रशांत दौलत वाघ यांनी गळफास घेतला. महसूल विभागाने वरिष्ठांना अहवाल सादर केला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कळवण तालुक्यात शेतकरी आत्महत्या

कळवण : अवकाळी पावसामुळे पिकांची नासधूस , शेतमालाला कवडीमोल भाव व कर्जाला कंटाळून तालुक्यातील गणेश खेडगाव येथील प्रशांत दौलत वाघ (वय ४९) या शेतकऱ्याने एक एप्रिलला सकाळी अकराच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. वाघ यांची गणेश खेडगाव येथे गट क्र. ११ हे. ६६ आर क्षेत्र आहे. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी आहे. महसूल विभागाने वरिष्ठांकडे अहवाल सादर केला आहे.